२००२ गुजरात दंगल प्रकरण
गुजरातमध्ये २००२ साली झालेल्या जातीय दंगलीत राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री तथा भारताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कथित भूमिकेच्या अनुषंगाने न्यूयॉर्कमधील न्यायालयाने मोदींवर समन्स बजावले असल्याचे वृत्त आहे. पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर अमेरिका दौर्यावर जाण्याच्या तयारीत असतानाच हा प्रकार घडला आहे. न्यूयॉर्कस्थित अमेरिकन जस्टिस सेंटर या बिगर व्यावसायिक मानवी हक्क संघटनेने अमेरिकेतील फेडरल कोर्टात गुजरात दंगलप्रकरणी दिवाणी खटला दाखल केला आहे. त्या संदर्भात गुरुवारी या न्यायालयाने वरील समन्स बजावले आहेत. तसेच मोदी यांनी २१ दिवसात या समन्सना प्रतिसाद देण्यास न्यायालयाने बजावले आहे.