अमीर सरफराजची लाहोरमध्ये हत्या

0
31

लाहोरचा डॉन अमीर सरफराजची हत्या करण्यात आली आहे. लाहोरमध्ये अमीरवर काही लोकांनी गोळ्या झाडल्या होत्या. यानंतर त्याचा मृत्यू झाला. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या सूचनेवरून अमीर आणि त्याच्या साथीदारांनी 2013 मध्ये लाहोर तुरुंगात बंद असलेल्या भारतीय नागरिक सरबजीत सिंगला बेदम मारहाण करत त्यांची हत्या केली होती. डिसेंबर 2018 मध्ये पाकिस्तानी न्यायालयाने पुराव्याअभावी सरबजीतच्या हत्येतील दोन आरोपींची सुटका केली होती. त्यात अमीर सरफराज आणि मुद्दसर यांचा समावेश होता. या दोघांविरुद्ध कोणीही साक्ष दिली नाही. पंजाबचा सरबजीत 1990 मध्ये चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात गेला होता. त्याला भारतीय गुप्तहेर म्हणत पाकिस्तानी सैन्याने बंधक बनवून ठेवले होते. 2013 मध्ये तुरुंगात पाकिस्तानी लोकांनी त्यांना मारहाण केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. दहशतवादी अफझल गुरूला भारतात फाशी दिल्यानंतर काही वेळातच तुरुंगात सरबजीतवर हल्ला झाला.