अमित शहा १ जुलै रोजी गोवा भेटीवर

0
101

>> लोकसभा निवडणुकीवर होणार चर्चा

२०१९ साली होणार्‍या लोकसभा निवडणुकीत भाजपलाच सत्तेवर आणण्यासाठी भाजपने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. या
पार्श्‍वभूमीवर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा येत्या १ जुलै रोजी दोन दिवसांच्या गोवा भेटीवर येत असून त्यांच्या स्वागताची तयारी पूर्ण झाल्याचे प्रदेश भाजपाध्यक्ष विनय तेंडुलकर व पक्षाचे प्रवक्ते आमदार नीलेश काब्राल यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.
शहा दि. १ जुलै रोजी सकाळी ११ वाजता गोव्यात दाखल होतील. मुरगाव मतदारसंघातील आमदार, पंच, नगरसेवक त्यांचे दाबोळी विमानतळावर स्वागत करतील. तेथून पणजी येथील आझाद मैदानावर येऊन हुतात्मा स्मारकाला ते श्रद्धांजली वाहतील. संध्याकाळी ४ वाजता येथील ङ्गिदाल्गो हॉटेलमध्ये आमदार, मंत्री, जिल्हा पंचायत सदस्य त्यांची ते भेट घेतील.
तद्नंतर संध्याकाळी ६ ते ७.३० दरम्यान राज्यातील प्रमुख व्यावसायिक त्यांची भेट घेऊन चर्चा करतील. रात्री ८.३० वाजता पक्षाचे पदाधिकार्‍यांबरोबर त्यांची होईल. या बैठकीत २०१९ च्या निवडणुकीवर चर्चा होईल. दुसर्‍या दिवशी म्हणजे दि. २ रोजी सकाळी मडगाव येथील कदंब बस स्थानकाजवळ असलेल्या पक्षाच्या दक्षिण गोवा कार्यालयाचे त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येईल अशी माहिती तेंडुलकर यांनी दिली.

घटक पक्षांना विश्‍वासात घेऊन राज्यसभा उमेदवार
पक्षाने अद्याप राज्यसभेसाठी उमेदवार ठरविलेला नाही. गोवा ङ्गॉरवर्ड, मगो व अपक्ष हे सरकारचे घटक असल्याने त्यांना विश्‍वासात घेऊनच पक्ष राज्यसभेचा उमेदवार निश्‍चित करणार असे प्रदेश भाजप अध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी काल सांगितले.
मगो, गोवा ङ्गॉरवर्ड व अपक्षांनी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना सरकार स्थापन करण्यासाठी मदत केली. त्यामुळे ते पुढील पाच वर्षांपर्यंत भाजप बरोबरच राहतील. त्यामुळे या सरकारला कोणताही धोका नसल्याचे तेंडुलकर यांनी एका प्रश्‍नावर सांगितले. कॉंग्रेस पक्ष ङ्गक्त अङ्गवा पसरविण्याचेच काम करीत असल्याचे ते म्हणाले. सरकारचा घटक पक्षांवर विश्‍वास असल्याचे ते म्हणाले.