अमली पदार्थ गैरव्यवहारावर नियंत्रणासाठी योग्य पावले : मुख्यमंत्री

0
65

राज्याच्या किनारी भागात अमली पदार्थांचा गैरव्यवहार चालतो. याबाबतीत आपण सहमत आहे. काही पर्यटक गोव्यात अमली पदार्थांसाठीच येतात. त्यामुळे अशा पर्यटकांवर नजर ठेवावी लागेल, असे सांगून अमली पदार्थांच्या गैरव्यवहारावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने अनेक उपाय घेतल्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यानी काल पत्रकारांना सांगितले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमली पदार्थांमुळे देशाला धोका निर्माण झाल्याने त्याचे पूर्णपणे उच्चाटन करण्याची गरज व्यक्त केली होती. या पार्श्‍वभूमीवरच पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना प्रतिक्रीया विचारली होती. अंमली पदार्थांचा विषय गंभीर स्वरूपाचा आहे. त्यामुळे सरकारही गंभीर असल्याचे ते म्हणाले. पोलीस महानिरीक्षक सुनिल गर्ग यांनी पोलीस खात्यातही भ्रष्टाचार होत असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यावर प्रतिक्रीया विचारली असता. याबाबतीत आपण पोलीस अधिकार्‍यांची बैठक घेऊन खबरदारीचे उपाय घेण्यास सांगणार असल्याचे त्यांनी सांगितले. पर्यटन व्यवसाय महत्वाचा आहे. गोव्याला उच्च दर्जाच्या पर्यटकांची गरज आहे. राज्याची प्रतिमा मलीन करणार्‍या पर्यटकांना आकर्षित करणार नाही, असेही त्यांनी सांगितले.