अमली पदार्थप्रकरणी केरी पेडणे येथील अटक केलेल्या स्थानिक संशयित रामा केरकर, रश्मी केरकर व शिवाजी केरकर यांना काल न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी दिली.
पेडणे पोलीस निरीक्षक जिवबा दळवी यांना केरी येथे आराडी येथे मोठ्या प्रमाणात संशयितांकडे अमलीपदार्थ असल्याची माहिती मिळाल्यानंतर सोमवार दि. १९ रोजी संशयितांच्या घरावर छापा टाकला. त्यावेळी रामा केरकर, रश्मी केरकर व शिवाजी केरकर यांच्याकडून एक कोटी रुपयांचे अमलीपदार्थ जप्त केले होते.
दरम्यान, आमदार दयानंद सोपटे यांनी मागच्या तीन महिन्यांपूर्वी पत्रकार परिषदेतून आपल्या मतदार संघात गैरकृत्यांसाठी गुंतलेले आहेत किंवा अमलीपदार्थ व्यवहारात गुंतलेले आहेत त्यांनी या व्यवहारातून त्वरित बाहेर पडावे. अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई करू असा इशारा दिला होता. दरम्यान, एवढ्या मोठ्या प्रमाणात अमलीपदार्थ जप्त केल्याने सर्वत्र पोलिसांचे अभिनंदन केले जात आहे.