राज्य सरकारच्या तांत्रिक शिक्षण संचालनालयाने अभियांत्रिकी आणि फार्मसी या पदवी अभ्यासक्रमांसाठीची पात्रता यादी काल आपल्या संकेतस्थळावर जाहीर केली.
या अभ्यासक्रमांसाठी अर्ज केलेल्या अर्जदारांनी पात्रता यादीची पडताळणी करून अर्जात काही त्रुटी असल्यास ५ सप्टेंबरपर्यंत त्यांची पूर्तता करावी. प्रवेशासंबंधी गुणवत्ता यादी १० सप्टेंबरपर्यंत संकेतस्थळावर जाहीर केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यातील जागांचे वितरण २० सप्टेंबर पर्यंत पूर्ण केले जाणार आहे.