अफगाणिस्तान स्थितीवर चर्चेसाठी सर्वपक्षीय बैठक

0
33

>> केंद्र सरकारकडून २६ ऑगस्टला आयोजन; परराष्ट्र मंत्र्यांची माहिती

केंद्र सरकारने अफगाणिस्तामधील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. गुरुवार दि. २६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता ही बैठक होईल. या बैठकीत तालिबानने सत्ता काबीज केल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये घडलेल्या घडामोडींबाबत परराष्ट्र मंत्रालयाने राजकीय पक्षांच्या नेत्यांना माहिती द्यावी, असे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत. या संदर्भात परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी काल ट्विट करून माहिती दिली.

काही दिवसांपूर्वी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी अफगाणिस्तानच्या मुद्यावर पंतप्रधान विरोधी पक्षांना माहिती का देत नाहीत, असा सवाल केला होता. त्यानंतर केंद्र सरकारने या प्रकरणी संपूर्ण माहिती देण्यासाठी बैठक आयोजित केली आहे.

‘जी-७’ देशांची आज तातडीची बैठक
अफगाणिस्तानवर तालिबानने ताबा मिळवल्यानंतर ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ‘जी-७’ देशांची तातडीची बैठक मंगळवार दि. २४ ऑगस्टला बोलवली आहे. जी-७ देशात कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, ब्रिटन व अमेरिका यांचा समावेश आहे.