अफगाणिस्तानकडून आयर्लंडला व्हाईटवॉश

0
119

>> रशिद खान सामनावीर
>> पॉल स्टर्लिंग मालिकावीर

अफगाणिस्तानने काल मंगळवारी झालेल्या तिसर्‍या व शेवटच्या एकदिवसीय सामन्यात आयर्लंडचा ३६ धावांनी पराभव केला. या विजयासह त्यांनी तीन सामन्यांची मालिका ३-० अशी खिशात घातली. अफगाणिस्तानने विजयासाठी समोर ठेवलेल्या २६७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आयर्लंडचा डाव ४७.१ षटकांत २३० धावांत आटोपला. चार बळी घेतलेला राशिद खान सामनावीर तर मालिकेत २८५ धावा केलेला आयर्लंडचा पॉल स्टर्लिंग मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर अफगाणिस्तानकडून राशिद खान याने सर्वाधिक ४८ धावा केल्या. मधल्या फळीत शाहिदी (२५ चेंडूंत १०), अफगाण (८२ चेंडूंत ४१) व नबी (५४ चेंडूंत ३२) यांनी कुर्मगती फलंदाजी करत दबाव वाढवला. नैबने ३६, मुजीबने नाबाद १८ व नवीनने नाबाद १० धावा करत संघाला अडीचशेपार नेले.
आयर्लंडकडून सिमी सिंग व क्रेग यंग यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले. प्रत्युत्तरादाखल खेळताना आयर्लंडकडून स्टर्लिंग याने सलग दुसरे शतक झळकावत ११९ चेंडूंत ९ चौकार व ६ षटकारांसह ११८ धावांची खेळी करत एकाकी झुंज दिली. इतरांनी निराश केल्याने त्याचे शतक व्यर्थ ठरले. अफगाणिस्तानकडून राशिदने २९ धावांत ४ गडी बाद केले.