राज्यातील वाढत्या वाहन अपघातांकडे सरकारी यंत्रणेचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वाहतूक संचालकांच्या कार्यालयात काल निदर्शने करून राज्यातील वाढत्या अपघातावर नियंत्रण आणण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी केली. राज्यात मागील 2-3 दिवसांत पाच जणांचा वाहन अपघातांत मृत्यू झाला. राज्यातील वाढत्या अपघातांकडे सरकारी यंत्रणेचे लक्ष वेधण्यासाठी अमित पाटकर जुन्ता हाउसमधील वाहतूक संचालकांच्या कार्यालयात काल भेट दिली. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना वाहतूक खात्याचे संचालक रजेवर असल्याची माहिती देण्यात आली. काँग्रेसचे कार्यकर्ते अपघात प्रकरणाचे राजकारण करायला वाहतूक संचालकाच्या कार्यालयात आलेले नाहीत, तर वाढते अपघाताकडे गंभीरपणे लक्ष देण्याची मागणी करण्यासाठी आले आहेत, असे पाटकर यावेळी म्हणाले.