अनुराचा पराभव

0
64

येथे सुरू असलेल्या २०,००० युएस डॉलर्स बक्षीस रकमेच्या अक्सियाता मलेशिया आंतरराष्ट्रीय चॅलेंज स्पर्धेत गोव्याच्या अनुरा प्रभुदेसाईला दुसर्‍या फेरीत पाचव्या मानांकित मलेशियाच्या यिन फून लिम हिच्याकडून संघर्षपूर्ण लढतीत २१-१५, १९-२१, २१-१४ असा पराभव पत्करावा लागला. तत्पूर्वी, अनुराने पहिल्या फेरीत इंडोनेशियाच्या रुसिदिना अंतारदायू रियोदिनगिन हिला सरळ गेममध्ये २१-१८, २१-११ असे नमवून दुसरी फेरी गाठली होती. मिश्र दुहेरीत योगेंद्रन कृष्णन व प्राजक्ता सावंत या मलेशियन-भारतीय जोडीने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करताना तैवानच्या लीन चिया यू व किओ यू वेन यांना २१-१९, २१-१५ असे हरविले.