अधिकार वापरण्यात अधिकार्‍यांची चालढकल

0
71

साबांखामंत्र्यांची कबुली
कामाचा आदेश दिल्यानंतर कंत्राटदाराने ३० दिवसांच्या आत काम सुरू करण्याचा नियम आहे. या मुदतीत काम सुरू न केल्यास किंवा कंत्राटदाराने अर्धवट काम सोडून दिल्यास संबंधित कंत्राटदारावर कारवाई म्हणून कंत्राट रद्द करण्याचा अधिकारी कार्यकारी अभियंत्यांना आहे. परंतु अभियंते तो अधिकार वापरीत नसल्याचे साबांखामंत्री सुदीन ढवळीकर यांनी डॉ. प्रमोद सावंत यांच्या प्रश्‍नावर सांगितले.
सार्वजनिक खाते अनियोजित कामाचे अधिक करीत असल्याचे सावंत यांनी सांगितले. साखळीच्या आमदारांनी या प्रश्‍नावर ढवळीकर यांना कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला. काही कंत्राटदारांविरुध्द दक्षता खात्याकडे तक्रारी दिल्याचे ढवळीकर यांनी सांगितले. आपले खाते केंद्रीय सार्वजनिक बांधकाम खात्याच्या सर्व नियमांचे पालन करून कामे करीत असल्याचे ढवळीकर यांनी सांगितले. या प्रश्‍नावरील चर्चेत ग्लेन तिकलो, सुभाष फळदेसाई यांनीही अनेक प्रश्‍न विचारले.