- मीना समुद्र
भिन्न प्रकृतीच्या रेषांची ही हात-मिळवणी आहे, सहकाराच्या, सहयोगाच्या भावनेचं आधिक्य त्यात आहे. अधिकाधिक रेषांचा एक मीलनबिंदू असला की त्यापासून विविध आकृती तयार होतात. अधिक चिन्ह हे जीवनाला, नवकलेला चालना देणारे, गतिमान करणारे आहे.
आमच्या लहानपणी गणपतीची वर्गणी मागायला कुणी आलं, कुणाला देणगी द्यायची असली किंवा गुरुजींना दान करायचं असलं, कुणाकडे लग्नमुंजीत सप्रेम भेटीचं पाकीट द्यायचं असलं तर आईवडील त्या रकमेत नेहमी १ रु. जास्त घालायला सांगत किंवा स्वतः घालत. म्हणजे १० रुपये असले तर ११ रु., ५० द्यायचे असले तर ५१ रु. घालून देत. १ रु.ची नोट नसेल तर रुपयाचं नाणं घालत. मला नेहमी प्रश्न पडे की समसंख्या देण्याऐवजी तो आकडा असा विषम का करतात? शिवाय नोटेसोबत रुपयाचं नाणं घातलं की पाकीट जड होई. आम्ही नाणं घालत असलो तर त्याचं तोंड चिकटवताना हमखास निसटून पडे. मी ही माझी शंका जेव्हा विचारली तेव्हा वडील हसून म्हणाले की वरच्या १ रु.नं फारसा फरक पडत नसला तरी तो पुढच्या दशकाची, शतकाची किंवा सहस्रकाची नांदी ठरतो. आपण वाढवून किंवा अधिक काही दिल्याचं आपल्याला समाधान आणि ज्याला दिलं त्यालाही. नेहमी वाढतं माप असावं. देताना अधिक द्यावं. हल्ली ५० रु.च्या जागी ५०० रुपये घालून द्यायचे असले तरी त्या गोष्टीची हटकून आठवण येते आणि त्या रकमेवर १ रु. वाढवून घातला जातो आपोआप. रुपया अगदीच चिल्लर गोष्ट आजच्या काळात. नगण्यच. पण तोही कधीकधी सापडत नाही तेव्हा ५ रु.चे नाणे कामी येते.
सत्यनारायण पूजेवेळी शिरा करताना आई सव्वापटीनं रवा, तूप, साखर वगैरे द्यायची याचीही आठवण येते. भटजींना दक्षिणा देतानाही पूर्वी सव्वा रुपया असे. आता १०१, ५०१ वगैरे. गणपतीला मोदक करताना २१ करतात. दुर्वा २१ वाहतात. साडी देताना ब्लाऊसपीस किंवा निदान रुमाल तरी ठेवला जातो. वस्त्रासोबत उपवस्त्र दान केले जाते.
पूर्वी भाजीबरोबर कडीलिंबाच्या आणि कोथिंबिरीच्या चार काड्या देण्याची पद्धत होती. एकूण काय तर ‘अधिकस्य अधिकं फलम्’ अशी लोकांची धारणा होती. दुसर्याचं कार्य वृद्धिंगत व्हावं म्हणून या रूपानं त्या शुभेच्छा असत. दानाची वृत्तीही होतीच. मात्र याचा अर्थ असा नव्हे की झाडाला अधिकाधिक पाणी घातलं की ती अधिक वाढतील, अधिक फुलं-फळं देतील. पण एखाद्या कामासाठी जितके जास्त कष्ट घेतले जातील, जितके जास्त प्रयत्न केले जातील तितके ते जास्त यशदायी होण्याची शक्यता मात्र नाकारता येत नाही. झाडाची जितकी जास्त निगराणी राखू तितकं ते जास्त फलदायी होईल. अशी चिंता, अति काळजी हेही ‘अति तिथे माती’ या म्हणीप्रमाणे नाशाला कारणीभूत होते.
शाळेत बेरीज-वजाबाकी शिकताना आडव्या रेघेला मधोमध छेद देणारी तेवढीच एक उभी रेषा काढली की गणितातलं अधिकाचं चिन्ह बनतं आणि अंकाची बेरीज केली की वाढती संख्या येते. अधिक चिन्हाच्या रेषांच्या टोकाशी आडव्या-उभ्या रेघा दिल्या की स्वस्तिक चिन्ह बनते. हे शुभसूचक असते. त्याच्या या रेघा पुढे वाढवून त्यापासून आणखी अधिक चिन्हे आणि स्वस्तिके बनतात. त्यामुळे स्वस्तिक हे वृद्धीचे प्रतीक आहे, तसेच ते विकासाचे, चढत्या-वाढत्या वैभवाचे, प्रगतीचे, नवसृजनाचे प्रतीक असल्याने ते शुभकल्याणकारी चिन्ह आहे. भिन्न प्रकृतीच्या (उभ्या-आडव्या) रेषांची ही हात-मिळवणी आहे म्हणजे सहकाराच्या, सहयोगाच्या भावनेचं आधिक्य त्यात आहे. अधिकाधिक रेषांचा एक मीलनबिंदू असला की त्यापासून विविध आकृती तयार होतात. अधिक चिन्ह हे जीवनाला, नवकलेला चालना देणारे, गतिमान करणारे आहे.
आपल्या जीवनात अधिकाधिक यशाचे, आनंदाचे क्षण येत-जात असतात. काळ सदैव सारखा नसतो. कालपटावर आलेला अधिकमास आपल्याला जणू हेच सांगत असतो. पितृपक्षातील अमावस्येनंतर म्हणजेच महालयानंतर घटस्थापना आणि नवरात्रप्रारंभ होतो. पण यावर्षी १८ सप्टेंबर २०२० ते १६ ऑक्टोबर २०२० असा तो शुक्रवारीच आरंभ आणि शुक्रवारीच समाप्त होत आहे. दर तीन वर्षांनी येणारा हा अधिकमास २७ ते २८ दिवसांचा असतो. हा महिना आपल्या कालगणनेच्या सोयीसाठी निर्माण झाला आहे. कोणी सौरमास तर कोणी चांद्रमासाप्रमाणे कालगणना करतात. ज्योतिष गणनेनुसार ३५६ दिवस, ६ तास, ११ सेकंद असे मिळून वर्ष बनते. चांद्रमासाप्रमाणे हाच काळ ३५४ दिवस, ९ तासांचा होतो.
सूर्यमासाप्रमाणे इंग्रजी महिने १२ आणि चांद्रमासाप्रमाणे धरलेले १२ महिने यात ११ दिवसांचं अंतर पडतं. तेव्हा त्या दोन्हीत सामंजस्य राखण्यासाठी, संतुलन राखण्यासाठी २८ ते ३६ महिन्यांनंतर प्रत्येक तिसर्या वर्षी अधिकमासाचा संभव होतो. सूर्य वर्षभर १२ राशीत प्रवेश करतो, पण अधिक मासात कोणतीही राशी नसते, त्यामुळे सूर्याचे संक्रमण होत नाही-
यस्मिन् मासे न संक्रांमि; मलमासः स विज्ञेयः
अशा प्रकारे हा अधिकमास ‘मलमास’ या नावाने ओळखला जातो. मल याचा अर्थ कश्मल, दोष, किल्मिष, पाप अशा वाईट गोष्टी. म्हणून या महिन्यात साखरपुडा, लग्न, मुंज, मुंडन, गृहप्रवेश, विहीर खणणे वगैरेंचा मुहूर्त वा कोणतेही शुभकार्य करीत नाहीत. पण मग या अधिकमासाला, मलमासाला ‘पुरुषोत्तममास’ असे नाव का पडले याची अतिशय मनोरंजक कथा सांगितली जाते. मलमास सर्वांकडून निंदित, अवमानित होत असे. तिरस्कृत मानला जाऊन त्याची छीः थू झाल्याने लज्जित होऊन तो विष्णुलोकांत गेला आणि आपली व्यथा निवेदन करून उद्धार करण्याची प्रार्थना केली तेव्हा भगवान विष्णू त्याला (कुणी कुणी मलमासाची देवीही म्हणतात) श्रीकृष्णाकडे घेऊन गेले आणि त्याला सुस्थितीत आणण्याविषयी विनविले. तेव्हा श्रीकृष्णाने मलमासाचा स्वामी स्वतः होऊन याला ‘पुरुषोत्तम मास’ म्हणून ओळखला जाईल असा वर दिला. सर्वश्रेष्ठ, गुणवान, कीर्तिवान आणि ऐश्वर्यवान बनून तो मास ‘पुरुषोत्तममास’ म्हणून ओळखला जाऊ लागला. सर्वसामान्यही पुरुषोत्तम बनू शकतो हे यावरून दिसून येते. तेव्हा सर्व दोष, पापं, कुकृत्याचं प्रायश्चित्त म्हणून आणि मोक्षप्राप्तीसाठी अनुष्ठान, दानधर्म, पूजन, यज्ञयाग, हवन, ध्यान अशी पुण्यप्रद कामे करण्याकडे सर्वांचा कल असतो. जावयाला ३३ अनरसे, वड्या, लाडू यांपैकी घालून चांदीचे ताट देण्याची प्रथा पूर्वी होती. सोने वा कपडेही देत. लेक कायम सुखात राहावी ही भावनाही त्यामागे असावी. त्यामुळे दुःख-दारिद्य्र नष्ट होऊन आणि धर्म-अर्थ-काम-मोक्ष हे चार पुरुषार्थ साध्य होऊन इतर राशींपेक्षा अधिक फळ मिळते असे भगवंतांनीच सांगितल्यामुळे दान व जपजाप्य केले जाते. भागवतपुराण, विष्णुपुराण यांचा रस यानिमित्ताने चाखता येईल. तीर्थस्थानी, गदी-सागरात स्नानाचा आनंद लुटता येईल. ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ हा मंत्र जपत मनशांतीचा अनुभव घेता येईल.