मांडवी नदीवरील तिसरा पुल अर्थात अटल सेतू काल बुधवारपासून पुढील १०० दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. पुलावर तातडीची दुरुस्ती करावयाची असल्यामुळे पुढील १०० दिवस अर्थात दि. २१ नोव्हेंबरपर्यंत अटल सेतू बंद असेल असे उत्तर गोवा जिल्हाधिकार्यांनी एका आदेशाद्वारे कळविले आहे.