अटकपूर्व जामीन; सुनावणी तहकूब

0
13

आसगाव येथे प्रदीप आगरवाडेकर यांच्या घराच्या मोडतोड प्रकरणातील संशयित आरोपी पूजा शर्मा हिने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात दाखल केलेल्या जामीन अर्जावरील सुनावणी गुरुवार दि. 18 जुलैपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. उत्तर गोवा जिल्हा न्यायालयाने पूजा शर्मा हिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. तिने जिल्हा न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिले आहे. दरम्यान, अजूनपर्यंत पूजा शर्मा पोलिसांना सापडू शकलेली नाही.