अखेर केरळात मान्सून दाखल

0
95

>>गोव्यात ११ पर्यंत शक्य

 

अखेर केरळात काल मान्सूनचे जोरदार आगमन झाले. यामुळे देशात मोसमी पावसास प्रारंभ झाल्याचे अधिकृतपणे स्पष्ट झाले आहे. केरळात मुसळधार पावसाच्या तडाख्याने एकाचा मृत्यू झाल्याचेही वृत्त आहे. मान्सून गोव्यात येत्या ११ पर्यंत सक्रीय होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
केरळसह लक्षद्विपमध्ये नैऋत्य मान्सून स्थिरावला आहे. तसेच तामिळनाडूच्या बहुतेक प्रदेशात, कर्नाटकच्या दक्षिण भागात बंगालच्या उपसागराकडेही मान्सूनने प्रवेश केला असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे. मंगळवारी रात्रीपासून केरळात मुसळधार पाऊस सुरू असून दरड कोसळण्याच्या दुर्घटनेत एक मृत्यूमुखी पडल्याचेही हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले.
आज दि. ९ ते ११ जून दरम्यान गोव्यासह दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामान खात्याने मंगळवारी मान्सून केरळात आज गुरुवारी दि. ९ रोजी दाखल होण्याचा अंदाज वर्तविला होता.