अक्षय कुमार, गोविंदा कोरोनाबाधित

0
57

अभिनेता अक्षय कुमार आणि गोविंदा यांना कोरोनाची लागण झाली आहे. गोविंदा यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, मागच्या काही दिवसांपासून माझी तब्येत ठीक नव्हती त्यामुळे मी स्वतःची कोरोना चाचणी केली ती पॉझिटिव्ह आली. गोविंदा यांच्या अगोदर सकाळीच अभिनेता अक्षय कुमारलासुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. सोशल मीडियावर अक्षय कुमारने आपली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली आहे.