लेखा खात्याने जानेवारी २०१८ मध्ये घेतलेल्या अकाउंटंटच्या परीक्षेला बसलेल्या परीक्षार्थींचे गुण वेबसाइटवर काल जाहीर केले आहेत.
लेखा खात्याने अकाउंटंटच्या भरतीसाठी घेतलेल्या उमेदवारांच्या लेखी परीक्षेचा निकाल २१ ऑगस्ट रोजी जाहीर केला होता. या परीक्षेत सर्व ८ हजार उमेदवार निर्धारित गुण मिळालेले नसल्याने नापास जाहीर झाल्याने खळबळ माजली होती.
वेबसाइटवरील माहितीनुसार १३ उमेदवारांना १०० ते ११५ पर्यंत तर ९० ते ९९ पर्यंत गुण केवळ ४५ परीक्षार्थींना मिळाले आहेत. पहिल्या पेपरमध्ये एका परीक्षार्थीला सर्वाधिक ६८ गुण मिळवले आहेत. पहिल्या पेपरमध्ये अनेकांना ५० ते ६० दरम्यान गुण मिळाले आहेत.
दुसर्या पेपरमध्ये ङ्गक्त दोघांना सर्वाधिक ५४ तर ङ्गक्त पाच परीक्षार्थींना ५० ते ५४ पर्यंत गुण मिळाले आहेत. परीक्षेच्या दुसर्या पेपरमध्ये ८४ जणांना शून्य तर २८२ जणांना १ ते ९ गुण मिळाले आहेत.