अंजुणे, आमठाणे धरणे तुडूंब भरली

0
98

डिचोली व सत्तरी तालुक्यात यंदा समाधानकारक पाऊस पडल्याने अंजुणे धरण व आमठाणे धरणात मुबलक जलसाठा उपलब्ध झाला असून दोन्ही धरणं भरली आहेत. १७ ऑगस्टपर्यंत २८९९ मिमि पावसाची नोंद झालेली आहे. अंजुणे धरणाचे चारही दरवाजे काही दिवसांपूर्वी खुले करण्यात आले होते. मात्र सध्या चारही दरवाजे बंद करण्यात आले आहेत.

सध्या दोन चार दिवसांत पावसाचा जोर कमी झाल्याने गेटस् बंद आहेत. धरणाची पातळी ९१.८८ मीटर आहे. धरणाची पूर्ण क्षमता ९३.२ मीटर आहे. आमठाणे धरण पूर्वीच ५० मीटर पूर्ण क्षमतेने भरलेले असून वीयरमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.