अंगावर झाड पडल्याने पणजीत दुचाकीस्वार जखमी

0
89

आल्तिनो येथील वीज सबस्टेशनजवळ गुलमोहरचे झाड अंगावर पडल्याने अमेय यशवंत पाटील हा विद्यार्थी जखमी झाला. अमेय पाटील हा आपल्या जीए ०७ जे ९८४७ या मोटारसायकलवरून सकाळी ७.३० वा. जात असताना त्याच्यावर झाड कोसळले. अग्निशामक दलाला माहिती मिळताच दलाच्या जवानानी घटनास्थळी जाऊन जखमीला इस्पितळात हलवले.