६२ पंचायतींचे सरपंचपद महिलांसाठी राखीव

0
30

>> पंचायत संचालनालयाकडून अधिसूचना जारी
>> ६४ पंचायतींवर महिला उपसरपंच विराजमान होणार

राज्य सरकारच्या पंचायत संचालनालयाने राज्यातील ग्रामपंचायतींतील महिला सरपंच आणि उपसरपंच पदाच्या राखीवतेची अधिसूचना काल जारी केली. पंचायत संचालक सिध्दी हर्ळणकर यांनी ही अधिसूचना काढली. त्यानुसार राज्यातील ६२ पंचायतींचे सरपंचपद महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे, तर ६४ पंचायतींचे उपसरपंचपद महिलांसाठी राखीव ठेवले आहे.

राज्यातील १८६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका १० ऑगस्ट रोजी घेतल्या जाणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर ग्रामपंचायतींतील महिला सरपंच, उपसरपंच पद राखीवता जाहीर करण्यात आली.
उत्तर गोव्यातील बार्देश तालुक्यातील सर्वाधिक ११ पंचायतींचे सरपंचपद महिलांसाठी राखीव असून, दक्षिण गोव्यातील सासष्टी तालुक्यातील ९ पंचायतींचे सरपंचपद महिलांसाठी राखीव आहे.
तसेच बार्देश तालुक्यातीलच सर्वाधिक ११ पंचायतींचे उपसरपंचपद महिलांसाठी राखीव असून, सासष्टी तालुक्यातील ११ पंचायतींचे उपसरपंचपद महिलांसाठी राखीव आहे.

महिलांसाठी सरपंचपद राखीव असलेल्या पंचायती पुढीलप्रमाणे आहेत.

उत्तर गोवा – सत्तरी तालुका : नगरगाव, पर्ये, केरी, सावर्डे. डिचोली तालुका : मुळगाव, पिळगाव, साळ, शिरगाव, सुर्ला, वेळगे. बार्देश तालुका : पिळर्ण-मार्ना, रेईश मागूश, रेवोडा, साल्वादोर द मुंद, सांगोल्डा, शिवोली-सडये, शिरसई, सुकूर, पोंबुर्पा, उस्कई, वेर्ला-काणका. पेडणे तालुका : पालये, केरी-तेरेखोल, तोरसे, तुये, वारखंड-नागझर, विर्नोडा. तिसवाडी तालुका : सा मातियश, जुने गोवे, शिरदोन-पाळे, सांताक्रूझ, सांन्तइस्तेव, सेंट लॉरेन्स (आगशी).
दक्षिण गोवा – सांगे तालुका : रिवण, सावर्डे, उगे. धारबांदोडा तालुका : साकोर्डा. केपे तालुका : मोरपिर्ला, नाकेरी बेतुल, शेल्डे, काणकोण तालुका : लोलये-पोळे, पैंगीण, श्रीस्थळ. सासष्टी तालुका : कोलवा, पारोडा, रुमडामळ-दवर्ली, सां जुझे द आरियल, सारझोरा, सेरावली, तळावली, वार्का, वेळ्ळी. मुरगाव तालुका : माजोर्डा, सांकवाळ, वेळसाव, वेर्णा. फोंडा तालुका : पंचवाडी, कवळे, शिरोडा, वेलिंग-प्रियोळ-कुंकळ्ये, वेरे-वाघुर्मे आणि वाडी-तळावली.
महिलांसाठी उपसरपंचपद राखीव असलेल्या पंचायती पुढीलप्रमाणे आहेत.

उत्तर गोवा – सत्तरी तालुका : भिरोंडा, खोतोडा, डोंगुर्ली-ठाणे, होंडा. डिचोली तालुका : अडवालपाल, आमोणा, कारापूर-सर्वण, कुडणे, लाटंबार्से, मये-वायंगिणी. बार्देश तालुका : हळदोणा, हणजूण-कायसूव, हडफडे-नागवा, आसगाव, अस्नोडा, बेस्तोडा, कळंगुट, कार्मुली, कांदोळी, कोलवाळ, पेन्ह दी फान्स. पेडणे तालुका : आगरवाडा-चोपडे, हळर्ण, हरमल, खाजने-आमेरे, कासारवर्णे, चांदेल-हंसापूर, धारगळ, मांद्रे. तिसवाडी तालुका : आजोशी-मंडूर, भाटी, चिंबल, करमळी, चोडण-माडेल, खोर्ली.
दक्षिण गोवा – सांगे तालुका : भाटी, काले, कुर्डी-वाडे. धारबांदोडा तालुका : कुळे. केपे तालुका : आंबावली, अवडे-कोठंबी, बाळ्ळी-अडणे, बार्शे. काणकोण तालुका : आगोंदा, खोतीगाव. सासष्टी तालुका : आंबावली, आके-बाईश, असोळणा, बेताळभाटी, कामुर्ली, कारमोणा, केळशी, चांदोर-कावरे, कुडतरी, लोटली, माकाझन. मुरगाव तालुका : कासावली, चिखली. फोंडा तालुका : बांदोडा, बेतकी-खांडोळा, बेतोडा निरंकाल, भोम, कुंडई आणि कुर्टी-खांडेपार.