‘हॅपी न्यू इयर’अंतर्गत १४४ मोबाईल हस्तगत

0
11

गोवा पोलिसांनी ‘हॅपी न्यू इयर’ ऑपरेशन अर्तंगत खिसेकापूंच्या आंतरराज्य टोळीतील २२ जणांना अटक करून त्यांच्याकडून १४४ मोबाईल फोन आणि १ लॅपटॉप हस्तगत करण्यात आला. स्थानिक पोलीस, रेल्वे पोलीस, सीमेवरील पोलीस यांच्या संयुक्त कारवाईतून या २२ खिसेकापूंना अटक करण्यात यश आले.

सरत्या वर्षाला निरोप व नववर्ष स्वागतासाठी किनारी भागात पर्यटक व नागरिकांकडून मोठी गर्दी केली जाते. या गर्दीचा गैरफायदा चोरटे घेतात. हॅपी न्यू इयर ऑपरेशनखाली पोलिसांनी विविध भागात संशयास्पद फिरणार्‍यांना ताब्यात घेऊन ही कारवाई केली.

कळंगुट पोलिसांनी १६ जणांना ताब्यात घेतले होते. हणजूण, रेल्वे पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेत त्यांच्याकडून मोबाईल जप्त केले होते.