हिट अँड रन प्रकरणी मिहीर शाहला अटक

0
10

मुंबईतल्या वरळी भागात भरधाव वेगात बीएमडब्ल्यू कार चालवून महिलेला चिरडल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाह याला काल अटक करण्यात आली. याशिवाय त्याची आई आणि बहीण यांनाला सुद्धा ताब्यात घेण्यात आले आहे. मिहीर शाह हा शिवसेना शिंदे गटाचे उपनेते राजेश शाह यांचा मुलगा आहे. रविवारी पहाटे बीएमडब्लू कारने दुचाकीवरून जाणाऱ्या एका दाम्पत्याला धडक दिली होती. या धडकेनंतर चालकाने महिलेला 100 मीटरपर्यंत फरफटत नेले होते, त्यात तिचा मृत्यू झाला होता.