हरमलमध्ये साडेसात लाखांचे अमलीपदार्थ जप्त

0
11

गोवा पोलिसांच्या अमलीपदार्थ विरोधी पथकाने काल हरमल येथे छापा घालून मध्यप्रदेशच्या एका युवकाकडून लाखोंचा अमलीपदार्थ जप्त केले. कल्पेश द्विवेदी (२७ वर्षे) असे या युवकाचे नाव असून, त्याच्याकडून सुमारे ७.४५ लाख रुपयांचे अमलीपदार्थ जप्त केले. संशयित कल्पेश याच्याकडून चरस, एलएसडी लिक्वीड व इतर अमलीपदार्थ हस्तगत करण्यात आला आहे.