स्मृती इराणींना मंत्रिमंडळातून डच्चू द्या

0
12

>> गिरीश चोडणकर यांची पंतप्रधानांकडे मागणी

केंद्रीय महिला आणि बाल कल्याणमंत्री स्मृती इराणी यांची गोव्यात बेनामी मालमत्ता असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू द्यावा. तसेच त्यांच्या या बेनामी मालमत्तेची चौकशी करावी, अशी मागणी कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.

यावेळी चोडणकर यांनी इराणी कुटुंबीयांच्या बेनामी मालमत्तेसंबंधीचे पुरावेही पत्रकार परिषदेत सादर केले. स्मृती इराणी यांची कन्या झोईश इराणी, पुत्र झोअर इराणी, पती झुबिन इराणी व अन्य एक कन्या शानील ईराणी यांच्या दोन कंपन्या असून, उग्रया मर्कंटाईल प्रा. लिमिटेड व उग्रय्या फार्म्‌स प्रा. लिमिटेड त्या कंपन्या होय. या दोन्ही कंपन्यांनी एटॉल फूड व बेवरेजीस एलएलपी या कंपनीत गुंतवणूक केलेली आहे आणि या कंपनीच्या कार्यालयाचा पत्ता आणि सिली सोल्स बार अँड रेस्टॉरंटचा पत्ता एकच आहे. सदर कंपनीचा जीएसटी क्रमांक आणि सिली सोल्स बार अँड रेस्टॉरंटचा जीएसटी क्रमांकही एकच आहे. हा एक योगायोग असू शकत नसल्याचे चोडणकर म्हणाले.