स्फोटात नौदलाचे तीन जवान हुतात्मा

0
14

मुंबईतील नौदलाचा तळ असलेल्या नेव्हल डॉकयार्डमध्ये मंगळवारी मोठी दुर्घटना घडली. येथील युद्धनौका आयएनएस रणवीरवर झालेल्या भीषण स्फोटात नौदलाचे तीन जवान हुतात्मा झाले. त्यानंतर जहाजावरील कर्मचार्‍यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेत जहाजाला फार मोठे नुकसान झाले नाही.