- डॉ मनाली महेश पवार.
सांत इनेज पणजी गोवा.
ऑक्टोबर महिना हा स्तनाच्या कर्करोगाच्या जागृतीचा महिना. स्तनाचा कर्करोग हा पहिल्या क्रमांकावर आहे. भारतीय महिला मध्ये सरासरी एक ते दीड लाख महिलाना याची लागण दरवर्षी होते. यातील साठ हजारच्या वर महिला स्तनाच्या कर्क रोगाने मृत्यू मुखी पडतात. स्तनाच्या कर्करोगाने मृत्यू मुखी पडण्याची संख्या भारतात जास्त आहे. ग्रामीण भागातील महिला पेक्षा शहरी भागातील महिला मध्ये हा आजार जास्त प्रमाणात आढळून येतो.
स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे.
_ स्तनांमध्ये कोणत्याही प्रकारची गाठ असणे हे स्तनाच्या कर्करोगाचे पहिले लक्षण. प्रत्येक गाठ ही कर्करोगाची नसते हे ही तेवढेच सत्य आहे.
_ स्तनाग्रामधून रक्त स्त्राव, पाणी, पू येणे.
_ निप्पल मागे ओढले जाणे.
_ निप्पल च्या कडाना जखमा होणे.
_ स्तनांची त्वचा जाड होणे.
_काखेत गाठ लागणे.
अशी लक्षणे महिलांमध्ये दिसत असल्यास त्वरीत तज्ञाचा सल्ला घ्यावा.
स्तनाच्या कर्करोगाची कारणे..
स्तनरोगाच्या कारणांमध्ये शिळे अन्न, रुक्ष, शुष्क, अतिउष्ण अन्न, विदाही भोजन करणे, रस रक्त दूषित करणारा आहार सेवन करणे. आज स्त्री एवढी र्लूीी झाली तिला स्वतःकडे लक्ष द्यायला, खायला, प्यायला वेळच नाही, त्यामुळे तिचं खाणं पिणं बदलले जे कर्क रोगाला पूरक ठरत आहे.
वंध्यत्व हे ही स्तन कर्करोगाचे आजचे महत्त्व पूर्ण कारण आहे.
उशिरा गर्भारपण त्यात स्तन्यपानाचा अभाव.
मद्य पान हे ही शहरी महिला मध्ये कर्करोगाचे कारण असू शकते.
लठ्ठपणा, व्यायामाचा अभाव, ताण तणाव.
पाळी गेल्यावरही, सौंदर्य टिकवण्यासाठी , काम जीवन व्यवस्थित ठेवण्यासाठी घेणारी औषधे ही देखील स्तनाच्या कर्करोगाची कारणे आहेत.
स्तनाची स्व तपासणी..
प्रत्येक स्त्रीने वयाच्या 21व्या वर्षानंतर स्वतःच्या स्तनाचे परीक्षण करावे. पाळी नंतर तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी स्व स्तनाचेअसे परीक्षण करावे आणि हाताने तपासणी करताना स्तनातील गाठ, स्तनाग्रा मध्ये झालेले बदल किंवा त्वचेमध्ये झालेले बदल जर आढळले तर कर्करोग तज्ञासा सल्ला लगेच घ्यावा. असे केल्यास कर्करोगाचे निदान होण्यास मदत होते.
स्तन कर्करोगातील टप्पे….
टप्पा 0 _ याला डुक्टल कार्सिनोमा इन सिटू म्हणून ओळखले जाते. हा टप्पा स्तनाच्या कर्करोगाचा सर्वात जुना प्रकार दर्शवतो जेथे असमान्य पेशी स्तनाच्या नलीकापर्यंत मर्यादित असतात आणि जवळच्या उतीमध्ये पसरत नाहीत. या टप्प्यावर रोग निदान झाल्यास शस्त्रक्रिया, रेडिएशन थेरपी दिली जाते.
टप्पा 1 हा टप्पा सुचित करतो की कर्करोग लहान व स्थानिकृत आहे ज्यामध्ये लिंफ नोडचासमावेश नाही.या टप्प्यावर अलीकडे अर्बुद काढून टाकतात व स्तनाचे सौंदर्य टिकवून ठेवतात . टप्पा 2 या टप्प्यात ट्यूमर मोठा असतो आणि जवळपासच्या लिफ्नोडस मध्ये पसरलेला असू शकतो. उपचारामध्ये शस्त्रक्रिया ,रेडिएशन, आणि हार्मोन थेरेपी यांचा समावेश होतो.
टप्पा 3. स्थानिक पातळीवर प्रगत स्तनाचा कर्करोग म्हणून ओळखला जाणारा हा टप्पा. या टप्प्यात मोठ्या ट्यूमर किंवा कर्करोगाचा समावेश आहे. उपचार हा अधिक आक्रमक असतो. त्यात अनेकदा कीमोथेरपी ,शस्त्रक्रिया आणि रेडिएशन थेरपी यांचा समावेश असतो.
टप्पा 4. मेटास्टॅटिक ब्रेस्ट कॅन्सर म्हणूनही ओळखला जातो. हा टप्पा हाडे ,यकृत ,फुफ्फुसे किंवा मेंदू यासारख्या शरीराच्या इतर भागांमध्ये पसरलेल्या कर्करोगाचे प्रतिनिधित्व करतो.
स्तनाच्या कर्करोगाचे उपचार वेगाने विकसित होत आहे अचूक औषध आणि एआयचलित डायग्नोस्टिक मधील नवकल्पनामुळे लँडस्केप बदलत आहेत.
कॅन्सरशी लढा रोगप्रतिकारशक्तीने...
आधुनिक वैद्यक शास्त्र प्रमाणे कॅन्सरचा यशस्वीपणे सामना करण्याकरिता कॅन्सरच्या जीवाणूशी लढावी लागते. आयुर्वेदिक तत्त्वज्ञानाप्रमाणे शरीरात दोन प्रकारे रोगांचे आक्रमण होत असते. वातावरणातील बाह्य जंतू व शरीरात रस रक्तादी धातु ,मलमुत्रादी तीन मलांच्या अनुक्रमे निर्मिती व वापरातील असमतोलाकडे लक्ष द्यायला हवे.
वातावरणातील जीवजंतूच्या सामना करण्याकरिता प्राणवायू शरीरात पुरेसा मिळेल याची मोठी जबाबदारी तुळशीची ताजी पाणी निभावतात.
बाह्य कारणामुळे बलक्षय होत असल्यास दर्जेदार काळया मनुका किमान 30-40 खाव्यात.
शरीरातील रस रक्तादी धातूंच्या निर्मितीत कमी अधिकपणा असल्यास यकृताच्या कार्याकडे प्रामुख्याने लक्ष द्यावे. त्याकरिता कोरफड पानांच्या ताज्या गराचा मोठा उपयोग होतो.
विविध अवस्थात ओल्या हळदीचा रस ,चटणी स्वरूपात वापर करावा.
आयुर्वेदिक संकल्पनेप्रमाणे केस व अस्थिधातू यांच्या स्वास्थ्याकडे बारकाईने लक्ष दिले तर अनेक रोगामध्ये रोगप्रतिकारशक्ती निर्माण करता, वाढवता येते. त्याकरिता गुळवेल , गोक्षुर,व आवळकाठी अशी तीन घटकद्रव्य असलेले रसायन चूर्ण सेवन करावे.
स्नायूंच्या स्वास्थ्याकरिता शतावरी, पचनाकरिता सुंठ , मिरे, पिंपली यांचे योगदान मोलाचे आहे.
स्तनाच्या कर्करोगाच्या जागृतीसाठी महिलांनी स्व तपासणी वर भर द्यावा. योग्य आहार विहाराला महत्व द्यावे. स्वतःसाठी वेळ काढावा. योग साधना करावी. आनंदी रहावे. कोणतीही महिला स्तनाच्या कर्करोगाने मृत्यू मुखी पडू नये या दृष्टीने प्रत्येकीने पाऊल उचलावे.

