हडफडे येथील बर्च या नाईटक्लबमधील भीषण आगीत 25 जणांचा बळी गेल्यानंतर राज्य सरकारने सुरक्षेबाबत तडजोड करणारे किनारी भागातील अनेक क्लब सीलबंद केले होते. आता, सरत्या वर्षीच्या अखेरीस सुरक्षेच्या कारणास्तव बंद केलेले क्लब पुन्हा सुरू झाल्याने चर्चेचा विषय बनला आहे.
राज्य सरकारने एका खास समितीची स्थापना करून किनारी भागातील क्लबमधील सुरक्षा उपाययोजनांचा आढावा आणि सुरक्षा उपाययोजनांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा निर्देश दिला होता. राज्य सरकारने नियुक्ती खास पथकाकडून विविध क्लबांची तपासणी मोहीम जोरात सुरू केली होती. या पथकाने सुरक्षा उपाययोजना आणि कागदपत्रांबाबत त्रुटी आढळून येणारे क्लब सीलबंद केले होते.
किनारी भागातील क्लबमधील सुरक्षेच्या समस्या कायम असताना बंद केलेले क्लब पुन्हा सुरू केले आहेत. सोशल मीडियावर या क्लब इव्हेंट्सच्या जाहिराती व्हायरल होत आहेत.
सीलबंद केलेल्या क्लबच्या मालकांनी दोन आठवड्यांच्या आत आवश्यक अनेक परवाने आणि मान्यता मिळाल्या आहेत. त्यामुळे क्लब ग्राहकांसाठी पुन्हा खुले केले आहेत.