सीबीआय नीरव मोदीसाठी इंटरपोलची मदत घेणार

0
207

भारतातील विविध बँकांना हजारो कोटी रुपयांचा गंडा घालून विदेशात पळालेल्या नीरव मोदी व त्याचा नातेवाईक मेहुल चोक्सी यांच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यासाठी सीबीआय इंटरपोलची मदत घेण्याची शक्यता आहे.
नीरव मोदी तसेच अमेरिकी नागरिकत्व असलेली त्याची पत्नी ऍमी, भाऊ निशाल (बेल्जियम नागरिक) व चोक्सी हजारो कोंटीचा घोटाळा करून विदेशात पळून गेले आहेत. या घोटाळ्यात सीबीआयने अलीकडेच स्वतंत्र आरोपपत्रे तयार केली आहेत. आता सीबीआय त्यांना ताब्यात घेण्यासाठी इंटरपोलची मदत घेणार आहे. इंटरपोलने त्यांच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी केल्याने इंटरपोलचे सदस्य देश संबंधित आरोपींना शोधून काढून त्यांना अटक करू शकतील असे सीबीआयचे म्हणणे आहे.