सिद्धेश नाईक बंडखोरी करणार नाहीत भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांना विश्‍वास

0
17

भाजपची उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले कुंभारजुवा मतदारसंघातील भाजपचे इच्छुक उमेदवार सिद्धेश नाईक हे बंडखोरी करणार नाहीत, असा विश्‍वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी काल व्यक्त केला.

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देणे आमच्या हातात नसते. केंद्रीय समितीकडून उमेदवारी दिली जाते. भाजप नेत्यांकडून सिध्देश नाईक यांची समजून काढण्याचे काम केले जात आहे, असेही तानावडे यांनी सांगितले.

माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर हे ज्येष्ठ नेते असल्याने त्यांनी निवडणूक रिंगणातून माघार घ्यावी, यासाठी केंद्रीय पातळीवरील नेत्यांकडून प्रयत्न केला जात आहे, असेही तानावडे यांनी सांगितले.