सार्वजनिक जागी मद्यपान, 10 जणांवर कारवाई

0
2

जुने गोवा पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या 10 जणांवर काल कारवाई केली. जुने गोवे पोलीस स्थानकाच्या कक्षेतील रायबंदर, खोर्ली, ओल्ड गोवा या भागात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्यावर कारवाईसाठी खास मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या दहाजणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.