साबांखामध्ये नोकरभरती घोटाळ्याचा आरोप

0
21

सार्वजनिक बांधकाम खात्यात कोट्यवधी रुपयांचा नोकरभरती घोटाळा झाला असून, सरकारने हे प्रकरण गुंडाळल्याचा आरोप माहिती हक्क कार्यकर्ते संजीव रायतुरकर यांनी काल केला. सरकारी खात्यातील भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही.

लोकांनी याविरुद्ध दक्षता खात्याला माहिती द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे; मात्र सार्वजनिक बांधकाम खात्यातील नोकरभरतीत पंतप्रधान व न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन करण्यात आले असून, नोकरभरती गैरव्यवहार झाला आहे, असे दक्षता खात्याने याआधीच स्पष्ट केले आहे. या नोकरभरतीत कोट्यवधींचा घोटाळा झाला असून, सरकार जनतेची थट्टा करीत आहे, अशी टीकाही रायतुरकर यांनी केली.