साबांखाच्या अभियंत्यांनी ला मागितल्यास तक्रार करा : काब्राल

0
23

>> कंत्राटदारांना आवाहन; अभियंत्यांचे धाबे दणाणले

सार्वजनिक बांधकाम खात्यातील कुठलाही अभियंता लाच मागत असेल, तर आपल्याकडे तक्रार करावी, असे आवाहन या खात्याचे मंत्री नीलेश काब्राल यांनी काल कंत्राटदारांना केले. त्यामुळे खात्यातील अभियंत्यांचे धाबे दणाणले आहेत.

सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये कंत्राटदारांची कामे करण्यासाठी त्यांच्याकडून लाच घेतली जात असल्याचा आरोप होऊ लागल्याच्या पार्श्‍वभूमीवर ते बोलत होते. सार्वजनिक बांधकाम खात्यातून वर्षभरात मोठ्या प्रमाणात वरिष्ठ श्रेणीतील अभियंते निवृत्त होणार आहेत. त्यांच्या जागी त्यांच्या हाताखालच्या अभियंत्यांना बढती मिळणे गरजे आहे. त्याबाबत पाठपुरावा करीत आहे, असेही काब्राल यांनी नमूद केले.