वीज, नळजोडणीप्रमाणे प्रत्ये घराला फायबर जोडणी देणार

0
29

>> माहिती-तंत्रज्ञान मंत्री रोहन खंवटे यांची माहिती

राज्यातील प्रत्येक घराला जशी वीज व नळ जोडणी देण्यात आलेली आहे, त्याच पद्धतीने आता माहिती-तंत्रज्ञान खाते प्रत्येक घराला फायबर जोडणी देणार असल्याची माहिती या खात्याचे मंत्री रोहन खंवटे यांनी काल दै. ‘नवप्रभा’शी बोलताना दिली.

इंटरनेट कनेक्टिव्हिटीसाठी ही फायबर जोडणी आवश्यक असून, लवकरच हे काम हाती घेण्यात येणार असल्याचे खंवटे यांनी स्पष्ट केले. शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांबरोबरच आता सर्वांनाच इंटरनेट कनेक्टिव्हिटीची गरज भासू लागली असून, त्याअभावी कोविड महामारीच्या काळात विद्यार्थ्यांचे, विशेष करून ग्रामीण भागांतील मुलांची केवढी गैरसोय झाली आणि किती शैक्षणिक नुकसान झाले, हे सर्वांनाच ठाऊक आहे, असेही खंवटे यांनी नमूद केले.

कनेक्टिव्हिटीअभावी कुणाचेही नुकसान होऊ नये, यासाठी राज्यातील सर्व घरे फायबरने जोडण्याची योजना माहिती-तंत्रज्ञान खात्याने तयार केली आहे. सध्याचे युग हे ५-जीचे असून, आघाडीचे पर्यटन राज्य असलेले गोवा हे कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत मागे राहणे हे शोभादायक नसल्याचे ते म्हणाले.