सांडपाणी वाहून नेणाऱ्या टँकरना मलनिस्सारण आणि साधनसुविधा विकास महामंडळाकडे नोंदणी करण्याची सूचना करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून सांडपाणी वाहून नेणाऱ्या टँकरना वेगळा रंग दिला जाणार आहे. टँकरचालकांनी 21 जूनपूर्वी नोंदणी करावी. नोंदणी न करणाऱ्या टँकरना सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांमध्ये प्रवेश दिला जाणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे.