सलमान खानच्या घराबाहेर अज्ञातांचा गोळीबार

0
7

बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील घराबाहेर काल रविवारी पहाटे पाचच्या सुमारास सकाळी दुचाकीने आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. या घटनेचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. दरम्यान सोशल मीडियावर अनमोल बिश्नोई या नावाने व्हायरल होत असलेल्या या पोस्टमध्ये सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारण्यात आली आहे. तसेच हा फक्त ट्रेलर असल्याचेही या पोस्टमध्ये म्हटले आहे. पोलिसांनी त्या दृष्टीने तपास सुरू करताना सीसी टीव्ही फुटेज तपासले. यात दोन्ही हल्लेखोरांची छायाचित्रे समोर आली असून यापैकी एकाची ओळख पटली आहे. सलमानच्या घरावर हल्ला करणाऱ्याची ओळख विशाल ऊर्फ कालू असे असून त्याने काही महिन्यांपूर्वी गुरूग्राममधील एका स्क्रॅप डीलरवर गोळीबार केला होता. मात्र दुसऱ्या संशयिताची ओळख पटलेली नाही.
वांद्रे येथील सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटसमोर दोन दुचाकीस्वारांनी 3 राऊंड गोळीबार केला. त्यामुळे सलमान खानच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.