Home Featured सर्व मंत्र्यांचा आज जनतेशी संवाद

सर्व मंत्र्यांचा आज जनतेशी संवाद

0

राज्य मंत्रिमंडळातील सर्व मंत्री आज (दि. 25) सकाळी 10 ते 12 या वेळेत पर्वरी येथील मंत्रालयात जनतेशी संवाद साधणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी सर्व मंत्री जनतेशी संवाद साधून त्यांच्या समस्या व प्रश्न जाणून घेतील.
राज्य मंत्रिमंडळातील सर्व मंत्री मंत्रालयात दर बुधवारी सकाळी मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी जनतेशी संवाद साधतील, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आठवडाभरापूर्वी भाजप आमदार आणि गाभा समितीच्या बैठकीनंतर केली होती. त्यानंतर आजपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे.
राज्यातील नागरिकांना त्यांच्या समस्या, प्रश्न, तक्रारी मंत्र्याकडे मांडण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. मंत्री भेटत नसल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाल्याने ही व्यवस्था करण्यात आली आहे. भाजप कार्यकर्त्यांचे प्रश्न व तक्रारी मांडण्याची व्यवस्था दर मंगळवारी भाजप मुख्यालयात करण्यात आलेली आहे.