सरकार थर्मल गन्स खरेदी करणार

0
142

राज्यातील सर्व उद्योगांनी आपल्या प्रवेशद्वारांजवळ ‘थर्मल गन’ ची सोय करावी, अशी सूचना काल मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केली. यासंबंधी पुढे बोलताना सावंत म्हणाले की राज्य सरकार थर्मल गन्स विकत घेणार असून ती सर्व उद्योगांना देण्यात येणार आहेत.

सरकारने राज्यातील औद्योगिक वसाहतीतील उद्योगांना त्यांचे उद्योग सशर्त सुरु करण्यास परवानगी दिलेली आहे.

काल म्हापसा येथील जिल्हा इस्पितळाला बंदर खात्याचे मंत्री मायकल लोबो यांच्यासह भेट दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील माहिती दिली.