समान नागरी कायद्याला ‘बसप’चा विरोध नाही

0
7

आम आदमी पक्षानंतर आता बहुजन समाज पक्षानेही समान नागरी कायद्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना बसपा प्रमुख मायावती यांनी रविवारी एक मोठे विधान केले आहे. बसपा यूसीसीच्या विरोधात नाही. पण, ते लादण्याला संविधान समर्थन देत नाही, असे विधान मायावती यांनी केले आहे. भाजपने यूसीसीशी संबंधित सर्व बाबींचा विचार करावा. आमचा पक्ष यूसीसी लागू करण्याच्या विरोधात नाही. यूसीसी लागू करण्याच्या भाजप मॉडेलवर आमचे मतभेद आहेत. भाजप युसीसीच्या माध्यमातून संकुचित राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहे, असे मायावती यांनी सांगितले. समान नागरी संहितेबाबत सध्या चर्चा सुरू असून समान नागरी संहिता विधेयकाबाबत केंद्र सरकार पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये आले आहे.