31 C
Panjim
Monday, January 25, 2021

संजीवनी कारखाना सुरू करावा : सुदिन ढवळीकर

 

गोवा सरकारने २०२०-२१ या वर्षी ५ कोटी रु. खर्चून संजीवनी साखर कारखाना चालू करावा अशी मागणी मगोपचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी काल एका पत्रकाद्वारे केली आहे.

संजीवनी साखर कारखाना बंद करण्यासाठीच्या हालचाली सुरु झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर गोवा बागायतदारचे चेअरमन ऍड. नरेंद्र सावईकर व भाजपच्या गाभा समितीच्या एका शिष्टमंडळाने मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेऊन कारखान्याबाबत त्यांच्याशी चर्चा केल्याबद्दल ढवळीकर यांनी आनंद व्यक्त केला. त्यांच्या या चर्चेतून काय निष्पन्न होणार आहे याची आपणाला माहिती नसल्याचे ते म्हणाले.

या साखर कारखान्यावर १५०० कुटुंबे अवलंबून आहेत. त्यामुळे या कारखान्यावर वर्षाला ५ कोटी रु. सरकारने खर्च करणे ही चिंता करण्यासारखी गोष्ट नसल्याचे ढवळीकर यांनी म्हटले आहे. १९७०-८०च्या दशकात मगो पक्षाने हा कारखाना पूर्ण विचारांतीच सुरू केला होता, असे नमूद करून त्यानंतर आलेल्या प्रत्येक मुख्यमंत्र्याने या कारखान्याला संजीवनी देण्याचा प्रयत्न केल्याचे ते म्हणाले. मात्र विद्यमान मुख्यमंत्री प्रमोद सावंत व सहकारमंत्री गोविंद गावडे यांना या कारखान्याविषयी काहीही वाटत नसल्याबद्दल ढवळीकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

ज्यावेळी आपण सहकार मंत्री होतो त्यावेळीही असाच हा कारखाना संकटात सापडला होता. परंतु तत्कालीन मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे यांचे मार्गदर्शन व सहकार्य यामुळे सर्व अडचणींवर मात करत आपण कारखाना चालू ठेवल्याचे ढवळीकर यांनी नमूद केले आहे.

STAY CONNECTED

845FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

गो गोवा ऑर्गेनिक

श्रीरंग व्यंकटेश जांभळे सध्या चालू असलेला शेतीतील रसायनांचा वापर जमीन, पर्यावरण, प्राणी, मनुष्य यांच्या आरोग्याला घातक असून याचे...

‘कोरोना’च्या आशीर्वादाचे- असेही अभ्यंग… अवती-भवती

अंजली आमोणकर या लॉकडाऊनपायी मिळालेल्या जबरदस्तीच्या कैदेत सर्वांना ‘मनाच्या अभ्यंगाचा’ आशीर्वाद मिळून गेला. एकमेकांचा यथेच्छ सहवास मिळाल्यामुळे, मनातल्या...

सेवानिवृत्तीनंतरची आर्थिक तजवीज

शशांक मो. गुळगुळे तुम्ही पेन्शनधारक असाल तर महिन्याला निश्‍चित ठरावीक उत्पन्न मिळू शकते. पेन्शन वृद्धांना स्वावलंबी बनवते. म्हणून...

दुभंगलेला अमेरिकन समाज

दत्ता भि. नाईक आतापर्यंत अमेरिकेतील द्विपक्षीय लोकशाही खेळीमेळीने चालते असा लौकिक होता. दोन्ही पक्षांमध्ये देशाच्या ध्येयधोरणांविषयी मतभिन्नता नसल्यामुळे...

कोरोनानंतरचे अर्थकारण

महेश देशपांडे, (गुंतवणूक सल्लागार) कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर बरेच काही बदलणार आहे. गुंतवणूक म्हणून मालमत्तेपेक्षाही शेअर्स तसंच...

ALSO IN THIS SECTION

‘इन टू द डार्कनेस’ला सुवर्ण मयुर

>> इफ्फीचा शानदार समारोप, अभिनेते विश्‍वजीत चटर्जी यांना भारतीय व्यक्तिमत्व पुरस्कार काल रविवार दि. २४ रोजी समारोप झालेल्या ५१व्या...

मुंबईत शेतकर्‍यांचा महामुक्काम सत्याग्रह

केंद्र सरकारच्या तीन नव्या कृषी कायद्यांविरुद्ध गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी मुंबईत महामुक्काम सत्याग्रह सुरू करण्यात...

दिल्लीत ट्रॅक्टर मोर्चासाठी पोलिसांनी दिली परवानगी

कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनातील शेतकर्‍यांनी उद्या मंगळवार दि. २६ रोजी प्रजासत्ताक दिनी टॅक्टर मोर्चा काढण्यासाठी...

आजपासून हिवाळी अधिवेशन

गोवा विधानसभेच्या चार दिवसीय हिवाळी अधिवेशनाला सोमवार २५ जानेवारीला सकाळी ११.३० वाजता प्रारंभ होणार असून २९ जानेवारीपर्यंत चालणार आहे. राज्यपाल भगत सिंग...

दाबोळी विमानतळावर ९३ लाखांचे सोने जप्त

दाबोळी विमानतळावर गोवा जकात विभागाने केलेल्या कारवाईत २ किलो १७० ग्रॅम वजनाचे तस्करीचे सोने जप्त केले. याची किंमत ९५ लाख ३ हजार...