शिकारीला गेल्यावेळी बंदुकीची गोळी लागून एकाचा मृत्यू

0
13

सोलये खोला येथे माटवेकारांच्या देवाच्या ‘भोवंडी’ला (शिकार) गेल्यावेळी बंदुकीची गोळी लागून कुशाली राम वेळीप (54) या व्यक्तीचे निधन होण्याची घटना काल रविवार दि. 7 एप्रिल रोजी घडली. कुशाली वेळीप हे गोवा दूरदर्शनमध्ये काम करत होते.
देवाच्या भोवंडीला गेल्यावेळी एक डुक्कर समोर दिसला म्हणून कुशाली हे त्याच्या मागे धावत गेले. या भोवंडीत सहभागी झालेल्या इतर लोकांना समोर पळणारा डुक्कर आहे अशी समजूत झाली आणि त्यांनी गोळी झाडली आणि त्यात श्री. वेळीप हे जखमी झाले. जखमी अवस्थेत कुशाली यांना त्वरित मडगावच्या जिल्हा इस्पितळात नेले. मात्र त्या ठिकाणी डॉक्टरनी त्यांना मृत घोषित करण्यात आले. काणकोणच्या पोलिसांनी पंचनामा करून मरणोत्तर तपासणीसाठी शव ताब्यात घेतले आहे. काणकोणचे पोलीस निरीक्षक हरिष देसाई या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत.