विरोधात राहून कामे होत नाहीत : लोबो

0
17

विरोधी पक्षात राहून लोकांची कामे होत नाहीत. लोकांची कामे करण्यासाठीच सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, असा दावा शिवोलीच्या आमदार डिलायला लोबो यांनी काल केला. राज्यातील विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्ष सत्तेवर आल्यास पक्षांतर करणार नाही, अशी शपथ घेतली होती. आम्ही कॉंग्रेसचे सरकार पाडलेले नाही; परंतु राज्यात आज भाजप सत्तेवर आले. त्या पक्षात आम्ही प्रवेश करणे चुकीचे वाटत नाही.

आपल्याकडे मतदारसंघातील अनेक नागरिक विविध कामांसाठी येतात. विरोधी पक्षात असल्याने त्यांची कामे होत नाही. मायकल लोबो दहा वर्षे सत्ताधारी भाजप पक्षात होते. त्यामुळे कळंगुट मतदारसंघाचा विकास झाला आहे. शिवोली मतदारसंघाच्या विकासाची गरज आहे. नागरिकांना भेडसावणार्‍या पाणी, वीज आदी मूलभूत समस्या सोडविणे गरजेचे आहे, असेही डिलायला लोबो यांनी सांगितले.