ख्यातनाम हिंदी कवी, कादंबरीकार व बाल साहित्यकार विनोदकुमार शुक्ला (87) यांना त्यांच्या समग्र साहित्यासाठी पेन नाबोकोव अमेरिका जीवनगौरव पुरस्कार प्राप्त झाला आहे. शुक्ला यांची ‘नोकर की कमीज’ ही कादंबरी आणि ‘सबकुछ होना बचा रहेगा’ हा कवितासंग्रह अत्यंत गाजला होता. आपल्या कविता व अन्य साहित्यातून लोकांच्या व्यथा व दु:ख यांना वाचा फोडणारे साहित्यिक अशी त्यांची ओळख आहे. अमित चौधरी, रोया हाकायािन आणि माझा मेन्झिस्ट या परीक्षक मंडळाने या आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी विनोदकुमार शुक्ला यांची निवड केली.