विधानसभा अधिवेशनात आज 8 सरकारी विधेयके विचारात

0
5

गोवा विधानसभेच्या सोमवार 7 ऑगस्ट 2023 रोजी पंधराव्या दिवशीच्या कामकाजात आठ सरकारी विधेयके विचारात घेतली जाणार आहेत.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून गोवा वस्तू आणि सेवा कर (सुधारणा) विधेयक 2023, गोवा मूल्यवर्धित कर (दुसरी दुरुस्ती) विधेयक 2023, गोवा (कर, व्याज, दंड आणि इतर थकबाकी वसुली सेटलमेंट) विधेयक 2023, आणि गोवा कर्मचारी निवड आयोग (सुधारणा) विधेयक 2023 ही चार विधेयके विचारात घेण्यासाठी मांडण्यात येणार आहेत.

महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांच्याकडून भारतीय मुद्रांक (गोवा दुसरी दुरुस्ती) विधेयक 2023, गोवा अनधिकृत बांधकामाचे नियमितीकरण (तृतीय दुरुस्ती) विधेयक 2023, गोवा सार्वजनिक परिसर (अनधिकृत रहिवाशांचे निष्कासन) दुरुस्ती विधेयक 2023 ही तीन विधेयके विचारात घेण्यासाठी मांडण्यात येणार आहे. तर, कायदा व न्यायमंत्री नीलेश काब्राल यांच्याकडून सोसायट्या नोंदणी (गोवा सुधारणा) विधेयक 2023 हे विधेयक विचारात घेण्यासाठी मांडण्यात येणार आहे. प्रश्नोत्तराच्या तासानंतर आमदार मायकल लोबो यांनी मांडलेली साळगाव येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पाबाबतची लक्षवेधी सूचना विचारात घेण्यात येणार आहे.