लोहखनिज उचलसाठी बोलीदारांना मुदतवाढ

0
1

राज्य सरकारच्या खाण खात्याने ई-लिलावात लोहखनिज खरेदी केलेल्या यशस्वी बोलीदारांना लोहखनिज उचलण्यासाठी मुदतवाढ दिली असून, येत्या 31 ऑक्टोबरपर्यंत यशस्वी बोलीदारांना लोहखनिज उचलण्याची सूचना करण्यात आली आहे. खाण खात्याच्या 27 व्या ई-लिलावापर्यंतच्या सर्व यशस्वी बोलीदारांसाठी ही मुदतवाढ लागू होत आहे. या वर्षी एप्रिलमध्ये सरकारने यशस्वी बोलीदारांना 31 मे पूर्वी प्राथमिक ठिकाणाहून खनिज उचलण्याची मुदत दिली होती. त्यानंतर ही मुदत 6 जूनपर्यंत वाढवण्यात आली होती. ई-लिलावातील यशस्वी बोलीधारांना लोहखनिज उचलण्यासाठी मूळ नोटिसीमध्ये केवळ 60 दिवसांची मुदत देण्यात आली होती.