लोकसभा आणि विधानसभेच्या पोटनिवडणुकांचा निकाल जाहीर

0
13

लोकसभेच्या ३ आणि विधानसभेच्या ७ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून यात भाजपने बाजी मारली आहे. लोकसभेच्या तीन जागांतील उत्तर प्रदेशातील रामपूर आणि आझमगढमध्ये भाजपने विजय साकारला आहे. आझम खान यांच्या राजीनाम्यामुळे आझमगड आणि अखिलेश यांच्या राजीनाम्याने रामपूरची जागा रिक्त झाली होती. दोन्ही जागा यापूर्वी एसपीच्या ताब्यात होत्या. तर पंजाबातील संगरूर येथे शिरोमणी अकाली दलचे (अमृतसर) सिमरनजीतसिंग मान विजयी झाले.

विधानसभेतही भाजपची बाजी
विधानसभेच्या सातही जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. या जागांसाठी २३ जून रोजी मतदान झाले होते. यामध्ये त्रिपुरामध्ये भाजपने ४ पैकी ३ जागा जिंकल्या आहेत आणि कॉंग्रेसने १ जागा जिंकली आहे. आपने दिल्लीतील राजेंद्रनगर जागा जिंकली आहे. त्याचवेळी वायएसआर कॉंग्रेसने आंध्र प्रदेशातील आत्मकूर जागा जिंकली आहे. झारखंडमधील मंदार मतदारसंघात कॉंग्रेसने विजय मिळवला आहे.