लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळून तिघे जखमी

0
11

जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातील मछना गावाजवळ भारतीय लष्कराचे ‘एएलएच ध्रुव’ हेलिकॉप्टर काल सकाळी 11 च्या सुमारास कोसळले. या हेलिकॉप्टरमध्ये पायलट, सह पायलट आणि एक जवान असे तिघे जण होते. या अपघातात हे तिघेही जखमी झाले. अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने पायलटने हेलिकॉप्टर उतरवण्याचा प्रयत्न केला; मात्र पायलटला त्यात यश आले नाही आणि हेलिकॉप्टर थेड माऊरा नदीच्या किनारी जाऊन कोसळले. या घटनेची माहिती मिळताच लष्कराचे बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तिन्ही जखमी जवानांना उधमपूरमधील लष्कराच्या रुग्णालयात दाखल केले.