लवू मामलेदार मृत्यू प्रकरणी आरोपपत्र दाखल

0
4

फोंड्याचे माजी आमदार लवू मामलेदार यांच्या मृत्यू प्रकरणात बेळगाव पोलिसांनी संशयित आरोपी अमीरसुहेल सनदीविरुद्ध 200 पानांचे आरोपपत्र स्थानिक न्यायालयात दाखल केले आहे. खडेबाजार बेळगाव येथे गेल्या 15 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 1.30 च्या सुमारास माजी आमदार लवू मामलेदार यांना एका रिक्षा चालकाने क्षुल्लक कारणावरून मारहाण केली होती. त्यानंतर लवू मामलेदार हॉटेलच्या पायऱ्या चढून खोलीत जात असताना वाटेतच कोसळले होते. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना ताबडतोब बेळगाव जिल्हा इस्पितळात दाखल केले. तेथे मामलेदार यांचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले होते. या प्रकरणी बेळगाव पोलिसांनी रिक्षाचालक अमीरसुहेल सनदीच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती. त्याने स्थानिक न्यायालयात दाखल केलेला जामीन अर्ज सुध्दा फेटाळण्यात आला होता.