राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी निधी द्या

0
18

>> मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे मागणी

राज्यात होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी मोठ्या निधीची गरज असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल आपल्या दिल्ली दौऱ्यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांची भेट घेऊन या क्रीडा स्पर्धांसाठी त्यांच्याकडे मदतीची मागणी केली. खासकरून या स्पर्धांसाठी साधनसुविधा उभारण्यास मोठ्या निधीची गरज भासणार असल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सीतारमन यांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी सीतारमन यांनी या क्रीडा स्पर्धांसाठी केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत देण्याचे आश्वासन दिले.

काल मुख्यमंत्र्यांनी आपल्या दिल्ली दौऱ्यात केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांचीही भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी ठाकूर यांच्याशी क्रीडा स्पर्धांबाबत चर्चा केली आणि या स्पर्धांच्या आयोजनासाठी जी तयारी केली जात आहे, त्याची माहिती देखील त्यांना दिली.
दरम्यान, या भेटीत मुख्यमंत्र्यांनी निर्मला सीतारमन यांच्याशी कॅसिनोंवर जो 28 टक्के जीएसटी लागू केलेला आहे, त्याबाबतही चर्चा केली.