‘राष्ट्रवादी’ काँग्रेस पक्ष अजित पवारांचाच

0
16

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केले शिक्कामोर्तब

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचाच यावर शिक्कामोर्तब केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी काल त्यांनी निकाल दिला. काही दिवसांपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवारांचे असल्याचा निर्णय दिला होता. त्यानुसारच नार्वेकरांनी निर्णय दिला आहे. तसेच अजित पवारांचे आमदार अपात्र नसल्याचेही नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे. शिवाय शरद पवारांच्या आमदारांनाही पात्र ठरवले आहे.
विधिमंडळात असलेल्या बहुमताच्या आधारे निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचाच असल्याचा निर्णय घेतला होता. नार्वेकर यांनी विधिमंडळातील संख्याबळ आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा संदर्भ घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचा असल्याचा निकाल दिला.

राहुल नार्वेकर यांनी 30 जून 2023 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले. 41 आमदारांनी अजित पवारांना अध्यक्ष मानले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या घटनेबाबत कोणताही वाद नाही. दोन्ही गटांना म्हणणे मांडण्याची संधी दिली. निकाल देताना संख्याबळ तसेच सचिवालयातील कागदपत्रांचाही विचार केल्याचे सांगितले. पक्ष घटना, नेतेपदाची रचना, विधिमंडळाच्या बहुमतावर पक्ष ठरवण्यात आला आहे. 30 जून रोजी अजित पवार यांना अध्यक्ष म्हणून निवड केली. अजित पवार हे अध्यक्ष होतात. तरी अजित पवारांची निवडणूक ही पक्षाच्या घटनेनुसार झालेली नाही, असेही नार्वेकर यांनी सांगितले. 29 जूनपर्यंत कोणीही शरद पवारांच्या अध्यक्षपदाला आक्षेप घेतला नव्हता. 30 जून रोजी शरद पवार पक्षाध्यक्ष आहेत आणि अजित पवार अध्यक्ष असे दोन दावे करण्यात आले. दोन्ही गटांनी राष्ट्रवादी घटनेनुसार अध्यक्ष निवडले गेल्याचा दावा केला होता. राहुल नार्वेकर यांनी, अजित पवारांना 41 आमदारांचा पाठिंबा आहे. तसेच नागालँडमधील आमदारांनाही त्यांना पाठिंबा दिला आहे. शरद पवार गटाने बहुमत असल्याचा दावा केलेला नाही, असे सांगितले.