राष्ट्रपतींच्या हस्ते अविनाश पारखे यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान

0
9

पणजी येथील दिशा या विशेष मुलांच्या विद्यालयाचे शिक्षक अविनाश मुरलीधर पारखे यांना काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रमाणपत्र, 50 हजार रोख आणि एक रौप्य पदक असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल 50 शालेय स्तरावरील शिक्षक, 13 उच्च शिक्षण स्तरावरील शिक्षक आणि 12 कौशल्य विकास मंत्रालयाच्या अंतर्गत शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार देण्यात आले.